विद्या बाल यांनी विचारलेल्या प्रश्नांची धर्मशास्त्रात सविस्तर उत्तरे दिलेली आहेत; पण नास्तिकवादी आणि पुरोगामी असलेल्या बाळ ते कधी मान्य करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : श्री शनिशिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी शासनाची भूमिका असंवेदनशील आहे. घटनेतील तत्त्वे आणि न्यायालयाने दिलेला निकाल यांची अंमलबजावणी करण्यामध्ये शासनाला अपयश आले आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की,
१. केवळ पुरुषांनी झुंडशाहीने प्रवेश केला, म्हणून बायकांना प्रवेश खुला करावा लागला, हे वास्तव आहे. खरेतर याचिकेचा निकाल लागला, तेव्हाच शासनाने जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आदेश देऊन महिलांचा मंदिर प्रवेश सुकर होण्यासाठी दक्षता घ्यायला हवी होती. मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाकडे ढुंकूनही पाहिले नाही.
२. निकाल लागल्यानंतर महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी चालू केलेल्या आंदोलनाचा धसका विश्वस्तांनी घेतला कि हे लोक खेळ खेळत आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले.
३. महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून दर्शनासाठी रोखणार्यांना ६ मासांचा कारावास आणि दंड आकारण्याची शिक्षा कायद्यामध्येच नमूद आहे. याचिकेचा निकाल लागण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक पत्र लिहून या घटनेची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली होती; परंतु त्यांनी त्याची पोचसुद्धा दिली नाही.
४. घटनेने स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही समान हक्क दिले असतांना महिलांना दुय्यम स्थान का दिले जाते ? मासिक पाळी येत असल्याने स्त्री अपवित्र कशी होते ? स्त्रीला पाळी येते म्हणूनच हे जग चालले आहे. देवानेच हे शरीर निर्माण केले आहे, हे वैज्ञानिक सत्य धार्मिक नेते स्वीकारणार आहेत कि नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात