चीनने अद्यापही घोषित केली नाही अधिकृत संख्या !
- ज्या चीनने कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांची खरी संख्या लपवली, तो भारतीय सैन्याकडून मोठ्या संख्येने ठार झालेल्या त्याच्या सैनिकांची खरी संख्या कधीतरी सांगील का ?
- चीनच्या ठार झालेल्या सैनिकांच्या संख्येवरून भारतीय सैन्याने चीनच्या विश्वासघातकी आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देऊन चीनला धडा शिकवला, हे कौतुकास्पद आहे. याचे भारतियांनी कौतुक केले पाहिजे !
वॉशिंग्टन (अमेरिका) : भारत आणि चीन यांच्या सैन्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असली, तरी चीनने त्याचे किती सैनिक ठार झाले, हे घोषित केलेले नाही. यापूर्वी चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने चीनचे ५ सैनिक ठार, तर ११ सैनिक घायाळ झाल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तेथील एका वृत्तसंकेतस्थळाने चीनचे एका कमांडिंग अधिकार्यासह ३५ सैनिक ठार झाल्याची वृत्त दिले आहे. दुसरीकडे ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने ४३ चिनी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे.
१. अमेरिकेच्या विश्लेषणानुसार चीन त्याचे सैनिक मारले गेले हे मान्य करणार नाही; कारण चीन हा त्याच्या सैन्यदलाचा अपमान समजतो.
२. ‘ए.एन्.आय.’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी रात्री चिनी हेलिकॉप्टरच्या फेर्या वाढल्या होत्या. स्ट्रेचरवरून चिनी सैनिकांना नेण्यात येत होते. तसेच रुग्णवाहिकेच्या फेर्यासुद्धा चालू होत्या. त्यावरून चीनच्या बाजूलाही मोठी जीवीतहानी झाल्याचे स्पष्ट होते; मात्र नेमकी किती हानी झाली ते लगेच स्पष्ट करता येणार नाही. असे असले, तरी ४० पेक्षा अधिक चिनी सैनिक मारेले गेल्याचा कयास आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात