Menu Close

(म्हणे) ‘भारताला एकाचवेळी चीन, पाकिस्तान, नेपाळ यांच्याशी सामना करावा लागेल !’ – चीनची धमकी

चीनच्या अशा पोकळ धमक्यांना भारताने भीक घालण्याची आवश्यकता नाही. चीन घाबरलेला आहे, हे या धमक्यांतून लक्षात येते ! या धमकीतून एक स्पष्ट होते की, ‘पाक आणि नेपाळ हे दोन्ही चीनचे बटीक झाले असून चीनच्या इशार्‍यावर ते भारताच्या विरोधात कारवाया करतील.’ भारतही या तिघांशीही सामना करण्यास सिद्ध आहे, हे भारतानेही अशाच प्रकारे घोषित केले पाहिजे !

चीनच्या ग्लोबल टाईम्सने असा इशारा दिला आहे की जर सीमेवर तणाव वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि नेपाळ यांना तोंड द्यावे लागेल !

नवी देहली : भारताचा एकाचवेळी चीन, पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यासमवेत सीमावाद चालू आहे. पाकिस्तान हा चीनचा विश्‍वासू समर्थक आहे. नेपाळशीही चीनचे घनिष्ठ संबंध आहेत. हे दोन्ही देश चीनच्या प्रस्तावित ‘बॉर्डर अँड रोड’ प्रकल्पातील भागीदार आहेत. भारताने सीमावाद वाढवला, तर त्यांना एकाचवेळी २ किंवा अधिक आघाड्यांवर दबावाचा सामना करावा लागेल. हे भारताच्या सैनिकी क्षमतेपलीकडे असून त्यांचा मोठा पराभव होईल, अशी धमकी चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखातून देण्यात आली.

‘शांघाय अ‍ॅकेडमी ऑफ सोशल सायन्स’मधील आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक हू झीहायाँग यांच्या विधानाचा संदर्भ या लेखामध्ये देण्यात आला आहे. हू झीहायाँग यांनी म्हटले की, ‘सीमेवरील परिस्थिती पालटण्याचा चीनचा कुठलाही हेतू नाही. गलवान खोर्‍यात जी घटना घडली त्याला भारतच उत्तरदायी आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *