Menu Close

नेपाळने चंपारण (बिहार) येथील भागावर दावा सांगत तेथील तटबंदीचे काम रोखले

नेपाळचा आणखी एका भारतीय भागावर दावा

नेपाळची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ होत असल्याने त्याने अशी अरेरावी चालू केली आहे. ती त्याचा आत्मघात केल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

चंपारण (बिहार) : येथील मोतिहारीमधील काही भागावर आता नेपाळने त्याचा दावा सांगितला आहे. नेपाळने येथील ढाका ब्लॉकमधील लाल बकैया नदीवरील तटबंदीचे काम थांबवले आहे. त्याचे म्हणणे आहे की, ‘या तटबंदीचा काही भाग त्याच्या सीमेत येतो. नेपाळने प्रथमच असा दावा केला आहे. यानंतर चंपारणच्या जिल्हाधिकार्‍यांनी या भागाचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. चीनच्या या दाव्यामुळे अडीच किलोमीटर लांब असलेल्या या तटबंदीचे ४०० मीटरचे काम थांबले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *