तिबेटमधील नेते भारताला गेल्या ६० वर्षांपासून चेतावणी देत असल्याचीही माहिती
भारताला असलेला धोका तिबेटला कळला, तो तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसींना कळला नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही काँग्रेसने गेल्या ६ दशकांमध्ये चीन प्रश्न का सोडवला नाही ? यासाठी काँग्रेसची चौकशी व्हायला हवी. यातून सत्य बाहेर येऊ शकेल !
नवी देहली : चीन करत असलेल्या हालचाली, या त्याच्या ‘फाईव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ या धोरणाचा भाग आहे. चीनची स्थापना करणार्या माओ त्से तुंग यांनीच हे धोरण आखले होते. जेव्हा चीनने तिबेटवर नियंत्रण मिळवण्याच्या संदर्भात चर्चा केली होती, त्या वेळी माओ त्से तुंग आणि अन्य चिनी नेत्यांनी ‘तिबेट हा तळहातासारखा आहे. त्यावर आपण नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर ‘आपण ५ बोटांचा विचार केला पाहिजे’, अशी चर्चाही या नेत्यांमध्ये झाली होती. या ५ पैकी पहिले बोट हे लडाख आहे. तर इतर ४ बोटे म्हणजे नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आहेत, अशी चेतावणी तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगे यांनी दिली. भारत आणि चीन यांच्यामध्ये चालू असणार्या संघर्षाविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना ते बोलत होते. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनकडून चालू असणार्या हालचाली या पूर्वनियोजित असल्याचा दावाही त्यांनी केला.
( सौजन्य: CNN-News18 )
सांगे पुढे म्हणाले की,
१. वर्ष २०१७ मध्ये डोकलाममध्ये आणि आता लडाखमध्ये घडत असणार्या घटना या ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’चा भाग आहे. चीनच्या याच धोरणासंदर्भात तिबेटमधील नेते भारताला मागील ६० वर्षांपासून चेतावणी देत आहेत.
(चित्र सौजन्य : eSakal.com)
२. वर्ष १९६२ च्या युद्धानंतर प्रथमच चीनने भारत-चीन सीमेवरील भूभागावर दावा केल्याने या भागामधील शांतता भंग पावली आहे. भारताने चिनी नेतृत्वापासून फार सावध रहाण्याची आवश्यकता आहे.
३. जोपर्यंत तुम्ही ‘तिबेटमध्ये नक्की काय घडले होते ?’, याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत तुम्हाला चीनचे नेतृत्व, मानसिकता आणि धोरणे यांविषयी पूर्ण माहिती मिळणार नाही.
४. भारत-चीन सीमेवर चालू असणार्या हिंसक घटनांमध्ये अनेकदा चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. चर्चेमधून प्रश्न सोडवणे, हाच एकमेव मार्ग आहे. भारताला त्याच्या प्रदेशाचे आणि सर्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.
५. चीनचे धोरण हे काठीला लावलेल्या गाजराप्रमाणे आहे. (आपण जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावर काठीला बांधलेले गाजर लांब जाणार) भारतानेही अशाच धोरणाचा अवलंब केला पाहिजे; मात्र भारताने घुसखोरीचा मार्ग निवडू नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात