Menu Close

गोवा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्यजागृतीविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान

शौर्यजागृतीसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे, ही काळाची आवश्यकता ! – सुमित सागवेकर, युवा संघटक

डिचोली : शौर्यजागृतीसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे, ही काळाची आवश्यकता आहे आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. सध्याच्या आपत्कालीन स्थितीत समाजाचे मनोबल वाढवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने नुकतेच गोव्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी युवकांसाठी शौर्यजागृती ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्याख्यानात श्री. सुमित सागवेकर यांनी ‘शौर्यजागरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना हे आवाहन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर आणि श्री. गोविंद चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानाला राष्ट्र-धर्मप्रेमी सुमारे ९० युवक ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.

युवा संघटक श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले, ‘‘देश स्वतंत्र झाल्यावर निधर्मी शासनप्रणाली कार्यवाहीत आणल्याने आपण अनेक वेळा पारतंत्र्यात असल्याप्रमाणे स्थिती अनुभवतो. देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. हिंदुत्वनिष्ठ नेते आणि संत यांचे ‘मॉब लिंचिंग’ केले जात आहे. पाठ्यपुस्तकांमधून आपला शौर्याचा इतिहास न शिकवता चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी गोव्यात धर्मांतराला आळा घातला, हा इतिहास लपवला जातो. देशात आज आपत्कालीन स्थिती आहे आणि या स्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्मबळाची आवश्यकता आहे. आत्मबळ वृद्धींगत करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे अत्यावश्यक आहे.’’

युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर ‘आपत्काळात साधनेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक युवकाने पावलोपावली धर्माचरण करून हिंदु संस्कृतीचे महत्त्व विश्‍वाला दाखवून दिले पाहिजे. युवकांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच आपले ‘करियर’ (ध्येय) बनवले पाहिजे.’’

व्याख्यानात सहभागी झालेल्यांचे अभिप्राय

१. क्रांतीकारकांचा खरा इतिहास समाजासमोर नेण्यासाठी गावागावात फलक प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीन – श्री. माधव विर्डीकर, हिंदुत्वनिष्ठ, मडगाव, गोवा.

२. व्याखानातून खूप शिकायला मिळाले. साधनेचे महत्त्व आणि स्वरक्षणाची आवश्यकता लक्षात आली. – श्री. दिगंबर जामदार, मडगाव आणि कु. मोहित बोकाडे, फोंडा, गोवा.

३. व्याख्यानामुळे स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले. – कु. प्रचीती गावणेकर, पणजी आणि श्री. प्रीतेश ताम्बोस्कर, पेडणे, गोवा.

क्षणचित्रे

१. व्याख्यानाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. श्री. निरंजन चोडणकर यांनी या वेळी केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेला महापूर आणि नेपाळ येथे वर्ष २०१५ ला आलेली आपत्कालीन स्थिती या वेळी समाजास साहाय्य करण्यासंबंधीचा स्वानुभव कथन केला. यामुळे उपस्थितांमध्ये आपत्काळाविषयी गांभीर्य निर्माण झाले.

२. उपस्थितांनी ‘ऑनलाईन’ स्वंरक्षण वर्गाची मागणी केली. शेवटी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर व्याख्यानाची सांगता झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *