याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : येथील तुलसी निकेतनमध्ये शेर खान उपाख्य शाहरूख याने दिवसाढवळ्या १९ वर्षीय नैना कौर हिची चाकूने भोसकून हत्या केली. त्याला नैनाशी विवाह करायचा होता; परंतु तिचा विवाह इंदूर येथील एक तरुणाशी निश्चित झाला होता. त्यामुळे खान याने नैनाची हत्या केली. यापूर्वी त्याने तिच्या घरी जाऊन हत्या करण्याची धमकीही दिली होती. या घटनेविषयी नैनाचे वडील बलदेव यांनी सांगितले की, ‘जेव्हा शाहरूख नैनावर चाकूने वार करत होता, तेव्हा तिला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. (अशी घाबरट जनता आतंकवादी आणि नक्षलवादी यांना कधीतरी सामोरी जाऊ शकते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पोलिसांनी शाहरूखचे मित्र आसिम आणि अमीर यांना अटक केली असून शाहरूख अद्याप पसार आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणार्यास २० सहस्र रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे.
पोलीस चौकीच्या २०० मीटर अंतरावर झाली नैनाची हत्या
हत्येच्या घटनास्थळापासून पोलीस चौकी २०० मीटर अंतरावर होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित झाली आहे. (निष्क्रीय पोलीस जनतेचे रक्षण करतील, अशी अपेक्षा न करता आता जनतेने ‘स्वतःचे रक्षण स्वतःच कसे करता येईल ?’, हे पहाण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात