Menu Close

चिनी सैन्यामुळेच भारतीय सीमेवर तणाव ! – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) : चीनचे सैन्य भारतीय सीमेवर तणाव वाढवत आहे. चीनच्या सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चा (‘सी.सी.पी.’चा) त्यांच्या शेजारी राष्ट्रांकडे पहाण्याचा दृष्टीकोनही वाईट आहे. सरकार कमकुवत करण्यासाठी ‘सायबर’ आक्रमणाद्वारे अमेरिका आणि युरोप येथे खोटा प्रचार करत आहे. चीन विकसनशील देशांना चीनवरील अवलंबत्व वाढवून त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली ठेवण्याचे काम करत आहे, असे आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी केले. ते एका कार्यक्रमात ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे बोलत होते.

(सौजन्य : Hindustan Times)

पॉम्पिओ पुढे म्हणाले की,

१. चिनी सैन्य जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतासमवेत तणाव निर्माण करण्यात गुंतले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन त्याच्या क्षेत्राचा अवैधरित्या विस्तार करत आहे. कोरोना विषाणूविषयीही चीन खोटे बोलला, तसेच त्याने हा विषाणू जगातील सर्व ठिकाणी पसरू दिला. हा कट लपवण्यासाठी चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला.

२. ‘सी.सी.पी.’ला केवळ चीनला लाभ होणारे नियम आणि कायदे अवलंबण्याची इच्छा आहे. सी.सी.पी.ने संयुक्त राष्ट्रांत केलेला करार मोडून हाँगकाँगचे स्वातंत्र्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

३. चीनने अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केले आहे. चीन मानवी अधिकारांचे हनन करत उघूर मुसलमानांवरही अत्याचार करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *