हिंदु जनजागृती समितीने प्रविष्ट केलेल्या पुनर्विचार याचिकेस यश !
पुरी येथील जगन्नाथ रथयात्रा ही जगविख्यात यात्रा आहे. ही रथयात्रा काही शतकांपासून चालू असून तिला एक मोठा इतिहास आहे. एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या आयोजनावर 18.6.2020 या दिवशी स्थगिती आणली होती.
यानंतर हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच या यात्रेवर पूर्णतः बंदी घालणे, हे अन्यायकारक आहे’, असे समितीने याचिकेद्वारे म्हटले होते. अन्य याचिकाकर्त्यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात पालट करण्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती.
सदर पुनर्विचार याचिका आणि केंद्र आणि ओडिशा सरकारांनी मांडलेले म्हणणे यांचा विचार करत न्यायालयाने श्री जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेला 22.6.2020 ला अनुमती दिली.
हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता श्री. सुभाष झा यांनी लक्षावधी भक्तांच्या वतीने हे प्रकरण लढल्याप्रीत्यर्थ हिंदु जनजागृती समितीने त्यांचे आभार मानले आहेत.