शाकाहाराचे महत्त्व न जाणता द्वेषापोटी त्याला विरोध करणारे असुरच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लक्ष्मणपुरी (लखनौ) : शाकाहारवाद हा राष्ट्रवादाच्या विरोधी आहे, असा जावईशोध व्हाय आय अॅम नॉट अ हिंदु या पुस्तकाचे लेखक कांचा इलैया यांनी लावला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कांचा इलैया यांनी उधळलेली मुक्ताफळे !
१. माझ्यासाठी राष्ट्रवाद हा गोमांस खाण्यापासून चालू होतो. दुर्दैवाने आपल्याकडे गोमांस खाण्यावर बंदी आहे. त्यामुळे आवश्यक तेवढी प्रथिने मिळत नसल्याने आपल्या बुद्धीची वाढ थांबली आहे. (कांचा इलैया यांची बुद्धीची किव करावी तेवढीच अल्प ! इलैया यांची विधाने म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. शाकाहाराने मेंदूची शक्ती क्षीण होते. शाकाहारी राष्ट्रवादाने तुम्ही चीन, कोरिया, जपान आणि अमेरिका या गोमांस, डुक्करांचे मांस, मासे आणि बेडूक खाणार्या राष्ट्रांशी स्पर्धा करू शकत नाही. ज्याला आपल्याकडे विष म्हटले जात आहे, असे पदार्थ खाऊन ती राष्ट्रे त्यांची बौद्धीक शक्ती वाढवत आहेत. (असे आहे, तर कांचा इलैया यांनी हे पदार्थ खाऊन स्वतःची बौद्धीक शक्ती वाढवून देशाची प्रगती करून दाखवावी किंवा हे पदार्थ खाण्यासाठी या देशांत कायमचे जाऊन रहावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. पंतप्रधान मोदी यांनी झाडू हातात घेतला आहे. मोदी शूद्र असल्याने त्यांच्या हातात आधीपासून झाडू होताच. आता त्यांनी हे करण्याची आवश्यकता काय ? खरेतर अरुण जेटली किंवा अरुण शौरी यांना झाडू मारायला लावा. (ही आहे कांचा इलैया यांची वैचारिक पातळी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. पंतप्रधान मोदी इंग्रजी शिकताहेत ही आनंदाची गोष्ट आहे. कमीतकमी एक शूद्र तसा प्रयत्नतरी करतो आहे; मात्र समस्या ही आहे की, शाकाहारी व्यक्ती चटकन शिकू शकत नाही. त्यामुळे मोदींनी चांगला आहार (मांसाहार) घेतला पाहिजे. (मोदी चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलतात, हे त्यांनी देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी केलेल्या भाषणांतून स्पष्ट झालेले आहे. असे असतांना खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल करणारे कांचा इलैया यांची विद्वेषी मानसिकता लक्षात येते ! अशी मानसिकता मांसाहारामुळे निर्माण झाली, असे कोणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. सॉक्रेटिस, प्लेटो, हे न्याय, प्रजासत्ताकविषयी लिखाण करत असतांना आपल्या देशातील अभ्यासक कामसूत्र लिहिण्यात व्यस्त होते. (ज्या काळात भारतात कामसूत्र लिहिण्यात आले, तेव्हा पाश्चात्त्यांना ते एक शास्त्र आहे, हेतरी माहिती होते का ? सॉक्रेटिसची आठवण येते, मग चाणक्यादि आचार्यांनी केलेले लिखाण आज महत्त्वाचे मानले जाते, हे इलैया यांच्या बुद्धीला पटते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात