भारतावर आरोप करणारा नेपाळ चीनविषयी मात्र मौन का बाळगून आहे, हे त्याने जगाला नव्हे, तर स्वतःच्या नेपाळी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट नेपाळी जनतेपासून लपवून ठेवल्यावरून नेपाळमधील राष्ट्रप्रेमी जनतेनेही साम्यवादी सरकारला जाब विचारला पाहिजे ! हा पूर्णच प्रकार पहाता नेपाळ सरकार चीनच्या ताटाखालचे मांजर बनले आहे, हेच खरे !
नवी देहली : नेपाळने भारताचे ३ भाग त्याचे असल्याचा दावा करत स्वतःचे मानचित्रच (नकाशा) पालटले आहे; मात्र दुसरीकडे चीनने नेपाळचाही विश्वासघात करत त्याच्या उत्तर गोरखा येथील रुई गावावर नियंत्रण मिळवले आहे. नेपाळच्या साम्यवादी पक्षाच्या सरकारने चीनचे हे कुकृत्य लपवण्यासाठीच भारताच्या ३ भागांवर दावा करण्याचे सूत्र उपस्थित केले आहे, असे वृत्त ‘न्यूज२४’ या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
१. रुई गावांमध्ये सध्या ७२ घरे आहेत. चीनने हा भाग चीनचा असल्याचे दाखवण्यासाठी येथील सीमेवरील नेपाळचे सीमा स्तंभ हटवले आहेत. सध्यातरी नेपाळच्या मानचित्रात हे गाव नेपाळचे असले, तरी प्रत्यक्षात त्याच्यावर चीनने नियंत्रण मिळवले आहे.
(सौजन्य : VK News)
२. इतिहासकार रमेश धुंगल यांनी सांगितले की, रुई आणि तेइगा ही दोन्ही गावे गोरखा जिल्ह्याच्या उत्तर भागात आहेत; मात्र नेपाळच्या निष्काळजीपणामुळे आता ते चीनच्या कह्यातील तिबेटमध्ये गेले आहेत. आतापर्यंत नेपाळच येथील महसूल जमा करत होता. त्याच्या नोंदीही आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात