सीतापूर (उत्तरप्रदेश) : येथील आझाद हिंद भगतसिंह संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. आझाद हिंद भगतसिंह संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अभिमन्यू यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ बैठकीत जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी व्हावे, यासाठी अधिवक्ता अभिमन्यू यांनी प्रयत्न केले. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. दळणवळण बंदी संपल्यानंतर दोन्ही संघटनांनी राष्ट्रहितासाठी संघटितपणे कार्य करण्याचे निश्चित करण्यात आले.
आझाद हिंद भगतसिंह संघटनेने दळणवळण बंदीच्या काळात गायींना चारा देणे, गरिबांना जेवण देणे इत्यादी कार्य केले.