भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्या नेतृत्वाखालील शोभायात्रेत १ लाखाहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !
भाग्यनगर (हैद्राबाद) : प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला. प्रखर हिंदुत्ववादी तथा तेलंगणाचे भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्रीराम युवासेनेने या शोभायात्रेचे आयोजन केले होते.
या वेळी मुख्य अतिथींच्या रूपात उत्तरप्रदेशचे भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि साध्वी प्राची उपस्थित होत्या. शोभायात्रेच्या आरंभी टी. राजासिंह म्हणाले, आपल्याला एक ना एक दिवस मरायचेच आहे; परंतु आपल्याला हे निश्चित करावे लागेल की, भारताच्या सीमेवर मरायचे, राष्ट्रासाठी मरायचे कि धर्मासाठी मरायचे ?
१. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही शोभायात्रेच्या मार्गावर येणार्या ३ मशिदींना कोणती हानी पोहोचू नये, या उद्देशाने कडक बंदोबस्तात त्यांना झाकून ठेवण्यात आले होते.
२. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी तंबू लावण्यात आले. पुष्पाहारांनी यात्रेचे स्वागत करण्यात आले, तसेच सहभागींना पाणी देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात