सिधोली (उत्तरप्रदेश) : भगवा युवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रेमजीत जायसवाल यांनी त्यांची संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांची एकत्रित एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत भगवा युवा संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेकडून करण्यात येत असलेल्या कार्याविषयीची माहिती सांगितली. यानंतर बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी समिती करत असलेल्या राष्ट्र-धर्मविषयक कार्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी फेसबूक, ट्विटर यांसारख्या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करणे, तसेच राष्ट्रहितासाठी या माध्यमांचा वापर करण्याविषयी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या २ वर्षांपासून वाराणसी येथे आयोजित करण्यात येणार्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात भगवा युवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रेमजीत जायसवाल सहभागी होतात.
दळणवळण बंदीच्या काळात भगवा युवा संघाच्या वतीने गरिबांना जेवण
भगवा युवा संघाच्या वतीने दळणवळण बंदीच्या काळात गायींना चारा देणे, गरिबांना जेवण देणे आणि मास्क उपलब्ध करून देणे आदी कार्य करण्यात आले.