Menu Close

चीनने आता नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

काही नद्यांचा प्रवाह पालटून आणखी प्रदेश बळकावण्याची शक्यता

  • भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, हे त्याने नेपाळी जनतेला आणि भारतालाही सांगितले पाहिजे !
  • संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला जात आहे, हे लक्षात घेऊन नेपाळी हिंदूंनी याविरोधात संघटितपणे विरोध केला पाहिजे !

काठमांडू (नेपाळ) : नेपाळच्या कृषी विभागाचा एक अहवाल समोर आला असून त्यात चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करून नेपाळचा काही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. ‘नेपाळच्या सीमा भागावर चीन लवकरच सैन्य छावणी उभारू शकतो’, अशी शक्यताही यात वर्तावण्यात आली आहे, असे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.

१. नेपाळच्या कृषी विभागाच्या भूमीच्या मोजणीविषयीच्या सर्वेक्षण खात्याने ११ ठिकाणांची सूची या अहवालामध्ये दिली आहे. या ११ पैकी १० ठिकाणी चीनने ३३ हेक्टर भूमी बळकावल्याचे म्हटले आहे, तसेच ‘नेपाळच्या सीमेजवळची अधिकाधिक भूमी कह्यात घेण्यात यावी, यासाठी चीन नद्यांचा प्रवाह पालटत आहे’, असेही यात म्हटले आहे.

(सौजन्य : NewsX)

२. चीनने बळकावलेल्या एकूण भूमीपैकी १० हेक्टर भूमी हुमला जिल्ह्यातील आहे. येथे बांधकाम करण्यासाठी चीनने बगदारी खोला नदी आणि कर्नाली नदी यांचा प्रवाह पालटला आहे, तसेच रासुवा जिल्ह्यातील ६ हेक्टर भूमी चीनने गिळंकृत केली आहे. तिबेटमधील बांधकाम करण्यासाठी नेपाळमध्ये येणार्‍या सीनजेन, भूर्जूक आणि जांम्बू खोला या नदींचे पात्र पालटण्यात आले आहे.

३. ‘तिबेटमधून नेपाळमध्ये येणार्‍या नद्यांचे मुख्य प्रवाह पालटण्यात आल्याने याचा नेपाळवर परिणाम होणार आहे. नद्यांचे प्रवाह असेच पालटत राहिले, तर नेपाळच्या मालकीचा बराच भूखंड हा नैसर्गिकदृष्ट्या ‘तिबेट ऑटोनॉमस रिजन’ म्हणजेच तिबेटकडे जाईल. पुढील काही काळामध्ये या ठिकाणी चीन ‘बॉर्डर ऑब्झर्वेशन पोस्ट’ (बीपीओ) चौक्या उभारण्याची दाट शक्यता आहे. या चौक्यांवर लवकरच सशस्त्र पोलीस गस्त घालतांना दिसतील’, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *