दौलत बेग ओल्डी आणि डेस्पांग सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला पेट्रोलिंग करण्यापासून रोखले !
चीन विश्वासघातकी आहे, हे पुनःपुन्हा सिद्ध होत असल्याने भारताने त्याच्याशी चर्चा करणे बंद करून त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे !
बीजिंग (चीन) : चीनने गलवान खोर्यातील संघर्षानंतर सैन्य माघारी घेण्याची सिद्धता दर्शवली. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र चीनने पुन्हा येथे बांधकाम चालू केल्याची माहिती समोर आली आहे. उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांमधून हे उघडकीस आले. तसेच दौलतबेग ओल्डी आणि डेस्पांग सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला पेट्रोलिंग करण्यापासून रोखल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
१. गेल्या आठवड्यात भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली. सध्या चीनकडून त्याच ठिकाणाच्या जवळ सध्या बंकर बनवण्याचे काम चालू असल्याचे या छायाचित्रांमधून दिसत आहे. या भागात लहान लहान भिंती बनवण्यात आल्या असून खोदकामही करण्यात आले आहे.
२. चिनी सैन्याने पँगाँग तलाव परिसरातही तळ ठोकला आहे. या भागातील चिनी सैन्याची संख्या वाढत आहे. पँगाँगच्या दक्षिणेला १९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य उपस्थित आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात