फोंडा : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. यामुळे देवस्थानच्या तलावात कुणीही आंघोळ, कपडे धुणे आदी कृती करू नयेत. तलावात कुणीही जुन्या वस्तू, छायाचित्रे (फोटो), जीर्ण मूर्ती, अस्थी, निर्माल्य आणि इतर वस्तू टाकू नयेत. तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक कपिलेश्वरी देवस्थान समितीने मंदिराचा तलाव आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत.
२४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या तलावामध्ये ‘सांजांव’ ही परंपरा साजरी करण्यास प्रतिबंध करावा आणि तलावाचे पावित्र्य राखावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने कपिलेश्वरी येथील श्री कपिलेश्वरी मंदिर, नागेशी येथील श्री नागेश मंदिर आणि बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिर यांच्या व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानंतर श्री कपिलेश्वर देवस्थान समितीने हा फलक लावला आहे.
कपिलेश्वरी, नागेशी आणि बांदिवडे येथील मंदिरांच्या तलावामध्ये ‘सांजाव’ साजरा झाला नाही
२४ जून या दिवशी श्री कपिलेश्वरी मंदिराचा तलाव, तसेच नागेशी येथील श्री नागेश मंदिर आणि बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिर यांच्या तलावांमध्ये ‘सांजाव’ साजरा करण्यात आला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात