Menu Close

आसाममध्ये धर्मांधांकडून आणखी एका हिंदु युवकाची निर्घुण हत्या

• नदीत फेकून दिला मृतदेह • ३ धर्मांधांना अटक • एका मासातील चौथी हत्या

  • काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्‍या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. हे पोलीस-प्रशासनाला लज्जास्पद !
  • हिंदूंच्या सलग होणार्‍या हत्यांविषयी पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी कुणीच का बोलत नाही ?
  • देशातील कुठलीही यंत्रणा हिंदूंच्या हत्या रोखू शकत नाही, हे हिंदूंच्या सलग होणार्‍या हत्यासत्रांवरून दिसून येते. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

डिब्रूगढ (आसाम) : येथील लेजाई येथे धर्मांधांनी १९ जून या दिवशी आणखी एका हिंदु युवकाची निर्घुण हत्या केली. सौरभ दास असे हत्या झालेल्या हिंदु युवकाचे नाव आहे. धर्मांधांनी सौरभची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सेसा नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी  रहीमुद्दीन अली आणि बहादुर शाह अली यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सौरभ १९ जूनला रहीमुद्दीन याच्या घरी गेला होता. तेथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सौरभची हत्या करण्यात आली.’ या घटनेच्या निषेधार्थ लेजाई परिसरातील नागरिकांनी २० जून या दिवशी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ रोखून धरला. ‘सौरभची हत्या, हा एक सुनियोजित कट आहे. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली नाही, तर आम्ही आंदोलन करू’, अशी चेतावणी स्थानिक नागरिकांनी दिली. परिस्थिती लक्षात घेऊन डिब्रूगढच्या जिल्हा प्रशासनाने लेजाई आणि बोर्डोइबाम या भागांत कलम १४४ लागू केले आहे.

आसाममध्ये गेल्या एका मासात झालेल्या हिंदूंच्या हत्या

१. २२ मे या दिवशी धर्मांधांनी क्षुल्लक कारणावरून सनातन डेका नावाच्या हिंदु युवकाची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी फैजुल हक आणि युसूफउद्दीन अहमद यांना अटक केली होती.

२. २९ मे या दिवशी येथील २३ वर्षीय देबाशीष गोगोई या हिंदु युवकाची जमावाने त्याच्या पित्यासमक्ष हत्या केली.

३. १२ जून या दिवशी धर्मांधांनी रितुपर्णा नावाच्या हिंदु युवकाचीही दिवसाढवळ्या हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दुलाल अली, इब्राहिम अली, इब्राहिमची आई मनोवर खातुन, हुसैन अली आणि अरमान अली यांना अटक केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *