चीनवर आर्थिक बहिष्कार टाकणे, हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ! – अमित गुप्ता, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, बजरंग सेना
पाटलीपुत्र (बिहार) : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ट्विटर’वर चालू असलेल्या ‘#ChineseProductsinDustbin’ (हॅशटॅग ट्रेंड) या अभियानामध्ये सहभागी होऊन चीनवर आर्थिक बहिष्कार टाकणे, हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन बजरंग सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित गुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि बजरंग सेना यांची संयुक्त ‘ऑनलाईन’ बैठक येथे नुकतीच झाली.
१. या बैठकीला संबोधित करतांना श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘गलवान खोर्यात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर विश्वासघाताने आक्रमण केले. या आक्रमणाला ‘जशास तसे’ उत्तर देत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले. आता आपल्यालाही या युद्धात सहभागी होऊन संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे.’’
२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय सिंह म्हणाले, ‘‘फळाची अपेक्षा न करता केेलेल्या कर्माला ईश्वर आणि संत यांचे बळ मिळते. बजरंग सेना आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना धर्मकार्यासाठी एकत्रित आल्या आहेत. श्री. गुप्ता यांनी उत्स्फूर्तपणे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी ‘व्हिडिओ संदेश’च्या माध्यमातून जागृती केली, तसेच समितीने चीनच्या विरोधात चालू केलेल्या ‘ट्विटर ट्रेंड’मध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन केले.’’
३. या ‘ऑनलाईन’ बैठकीला उपस्थित सर्व बजरंंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे समितीच्या #ChineseProductsinDustbin या अभियानामध्ये सहभागी होण्याचा निश्चय केला.
बजरंग सेना पदाधिकार्यांच्या प्रतिक्रिया
१. श्री. पंचदेव सिंह, राष्ट्रीय संघटनमंत्री, गुजरात : गुजरातमध्ये ‘एम्ब्रॉयडरी’ यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यामध्ये चिनी आस्थापनांचे वर्चस्व आहे. मी गुजरातमधील व्यापारी वर्गाला चिनी वस्तूंचा विरोध करण्याचे आवाहन करीन.
२. श्री. संजीव सिन्हा, राष्ट्रीय प्रवक्ते, बजरंग सेना : चिनी ‘अॅप्स’चा प्रचार-प्रसार करणार्या अभिनेत्यांच्या चित्रपटांना विरोध केला पाहिजे.
३. श्री. रामप्रवेश, सहसंपर्क प्रमुख, बजरंग सेना : चिनी खेळण्यांचा व्यवसाय करणार्या व्यापार्यांचे प्रबोधन करून त्या उत्पादनांचा विरोध करीन.