कणकवली : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी २१ जूनपासून ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गास प्रारंभ करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समितीच्या वतीने विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग घेतले जात होते.
सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केलेल्या आशीर्वचनपर मार्गदर्शनाने या धर्मशिक्षण वर्गाचा प्रारंभ झाला. २१ जूनला सकाळी १० ते ११.३० या वेळेत घेतलेल्या या वर्गाचा लाभ जिल्ह्यातील ७० जिज्ञासूंनी घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे यांनी हा पहिला धर्मशिक्षणवर्ग घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले. दळणवळण बंदी असेपर्यंत प्रत्येक रविवारी हा वर्ग घेतला जाणार आहे. ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे जिज्ञासूंना या वर्गात त्यांच्या शंकांचे निरसनही करता येणार आहे.
अभिप्राय
डॉ. सदानंद देसाई : सनातनचे सर्व प्रकारचे ग्रंथ दाखवावेत, अशी विनंती.
श्री. साईप्रसाद भिसे, हॉटेल शिवमल्हारचे मालक : ग्रहण काळात सत्संगाचा लाभ मिळाल्याविषयी कृतज्ञ आहे.