राजकीय दबावामुळे पाकच्या विमान वाहतूक आस्थापनामध्ये झाली होती भरती !
इस्लामाबाद : पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर ही माहिती समोर आली. पाकमधील ८६० पैकी २६२ वैमानिकांचे परवाने बनावट असल्याचे उघड झाले. या सर्वांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’च्या प्रवक्त्याने दिली. या ‘एअरलाईन्स’मध्ये वैमानिकांची नियुक्ती राजकीय दबाव आणि त्यांच्या हस्तक्षेपाच्या आधारावर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात