Menu Close

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

बलपूर्वक निकाहही केला

पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जकोबाबाद येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे वजीर हुसैन नावाच्या धर्मांधाने अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले, तसेच तिच्याशी निकाहही केला. १८ जून या दिवशी ही घटना घडली.

यास विरोध होऊ लागल्यावर हुसैनने पीडित हिंदु मुलीवर दबाव आणत तिच्याकडून शपथपत्र लिहून घेतले. त्यात ‘मी १९ वर्षांची असून मी माझ्या मर्जीने इस्लाम स्वीकारला आहे’, असे तिच्याकडून बलपूर्वक लिहून घेतले. आता तिचे नाव बशीरन ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, ‘पाकमध्ये प्रत्येक वर्षी न्यूनतम १ सहस्र मुसलमानेतर मुलींना इस्लाम स्वीकारलायला भाग पाडले जाते. यातील बहुतांश मुली सिंध प्रांतातील हिंदु धर्मीय आहेत.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *