देवतेची मूर्तीही फोडली !
- अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा !
- भारतातील अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा अहवाल देणारी अमेरिका स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांवर आक्रमण होऊनही त्याविषयी काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यू मेक्सिको शहरातील सँटा फे सिटी येथे काही जणांनी ‘इंडिया पॅलेस रेस्टोरंट’मध्ये घुसून तोडफोड केली आणि तेथील भिंतींवर द्वेषपूर्ण मजकूर लिहिला. याशिवाय आक्रमणकर्त्यांनी येथील देवतेची मूर्तीही फोडली. याविषयी या रेस्टॉरंटचे मालक बलजीत सिंह यांनी या आक्रमणात ७५ लाख रुपयांची हानी झाली असल्याचे सांगितले. स्थानिक पोलीस आणि फेडरल इन्वेस्टिगेशन ब्यूरो (एफ्.बी.आय.) या घटनेचे अन्वेषण करत आहे.
१. अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
२. येथील शिखांचे म्हणणे आहे की, ‘हा भाग अत्यंत शांत आहे. येथे वर्ष १९६० पासून शीख रहातात; मात्र आतापर्यंत अशी घटना कधीही घडली नव्हती.’
An #Indianrestaurant owned by a Sikh in the #SanteFe city in the #US state of #NewMexico was broken into and vandalised with hate messages scrawled on its walls, according to a media report.https://t.co/s776zOJsPr
— Firstpost (@firstpost) June 24, 2020
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात