ओली यांच्यात धाडस नसल्याने आणि त्यात तथ्य नसल्याने ते भारताचे नाव घेऊन त्याच्यावर थेट आरोप करू शकत नाहीत, हे लक्षात येते ! चीनच्या ताटाखालचे मांजर बनून भारताला डोळे वटारून दाखवणार्या ओली यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडूनच धडा शिकवला जाईल, असेच दिसून येत आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यावे !
काठमांडू (नेपाळ) : नेपाळचे नवे मानचित्र (नकाशा) बनवल्यापासून मला पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहराच्या हॉटेलमध्ये बैठका चालू आहेत. यात एक दूतावासही सक्रीय आहे. मला हटवण्याचा प्रयत्न चालू असला, तरी ते अशक्य आहे. नवीन मानचित्र प्रकाशित केल्यानंतर एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला हटवले जाईल, असा कुणी विचारही केला नसेल, अशा प्रकारचे आरोप नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी भारताचे थेट नाव न घेता भारतावर केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. चीनने नेपाळचा भूभाग बळकावल्याच्या आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या सूत्रावरून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात वाद चालू असून पक्षाचे कार्याध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान ओली शर्मा यांना त्यागपत्र देण्याची मागणी केली आहे.
Amid many in the ruling #Nepal Communist Party seeking KP Sharma Oli’s resignation, the Nepalese PM said that it's impossible to remove him.
Report: @sujjha https://t.co/jROuQzcu4j— IndiaToday (@IndiaToday) June 28, 2020
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात