Menu Close

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन वैद्यकीय कार्यशाळा !

येत्या भीषण काळाच्या दृष्टीने डॉक्टरांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात योगदान देेण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

एका कोरोनाने जगाला गुडघ्यावर टेकण्यास भाग पाडले आहे. येत्या काळात आणखीन भीषण आपत्काळ येणार असल्याचे काही द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. यात युद्ध वा मानव निर्मित आपत्ती आल्यास समाजरक्षणाचे मोठे दायित्व आपल्यावर येणार आहे. अशा वेळी सर्व डॉक्टरांनी समाजामध्ये जाऊन विविध घटकांना प्राथमिक स्तरावरील वैद्यकीय प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कोणती आपत्ती ओढवल्यास काय करावे, हे समाजाला शिकवणे आवश्यक आहे. यासाठी सर्व डॉक्टरांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात स्वतःचे योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने 28 जून या दिवशी एका ऑनलाईन वैद्यकीय कार्यशाळेत ‘राष्ट्र-धर्माची सद्य:स्थिती आणि डॉक्टरांचे योगदान’ या विषयावर बोलत होते. या कार्यशाळेला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथून मोठ्या प्रमाणात डॉक्टर, तसेच सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पूज्य अशोक पात्रीकर हे उपस्थित होते. शंखनाद आणि वेदमंत्रपठणाने या कार्यशाळेला प्रारंभ झाला. कार्यशाळेचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितला, तर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘आगामी काळात सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन राष्ट्र-धर्मासाठी कार्य करणे आवश्यक असल्या’चे सांगितले. त्यावर डॉक्टरांना आपत्काळाच्या दृष्टीने कृतीशील होण्यासाठी दर 15 दिवसाला एकत्र येण्याचे निश्‍चित केले आहे.

सनातन संस्थेचे पूज्य अशोक पात्रीकर म्हणाले की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे भारतीयांमध्ये मानसिक तणाव व भीती निर्माण झाली आहे. विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, विकार होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन समाजाला साहाय्य केल्यास आपण समाजऋणातून मुक्त होऊन आपली काळानुसार साधना होणार आहे.

‘आपत्काळात प्रथमोपचाराची आवश्यकता आणि त्यासाठी आपले प्रयत्न’ या विषयावर बोलतांना कान, नाक व घसा तज्ञ डॉ. (सौ.) साधना जरळी म्हणाल्या की, ‘भारतात 10 प्रतिशत मृत्यू हे प्रथमोपचारांच्या अभावी होतात. सध्याचा काळ हा आपत्काळ, तसेच युद्धजन्य काळ आहे, यामध्ये समाजाला साहाय्य करणे, हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात विनामूल्य प्रथमोपचार वर्ग घेतले जातात’. यावेळी कार्यशाळेत उपस्थित डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विनामूल्य प्रथमोपचार वर्ग आयोजित करण्यासाठी 7057368860 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *