Menu Close

मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केली आहे का ?, असे प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत ! – हिंदु विधीज्ञ परिषद

मुंबई : पोलिसांनी कु. करिश्मा हिच्या आईला दिलेली नोटीस योग्यच असेल; परंतु जर तिच्या आईला पोलिसांकडून नोटीस दिली जाते, तर पोलिसांनी संबंधित मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी किंवा आवाज न्यून करण्यासाठी काय कारवाई केली आहे ?, त्यांच्यावरती गुन्हा नोंद केला आहे का ?, संबंधित मशिद अधिकृत आहे किंवा अनधिकृत याविषयी चौकशी केली आहे का ?, तिथे बांगलादेशी नागरिक रहात आहेत का ?, अशी काही सूत्रे आपण पडताळली आहेत का ?, तिथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जाते आहे का किंवा त्यांना आपण काही अशा स्वरूपाची नोटीस दिली आहे का ?, असे प्रश्‍न आज अनेकांना आहेत, असे प्रश्‍न उपस्थित करणारे एक पत्र हिंदु विधीज्ञ परिषदेने पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस कमिशनर यांना पाठवले आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, करिश्मा भोसले यांना दिलेली नोटीस सामाजिक माध्यमांवर फिरत आहे; पण पोलिसांनी काय कारवाई केली ?, याविषयी काही कळत नाही. तरी पोलिसांनी या संदर्भातील सर्व माहिती स्वतःहून आपल्या ट्विटर हँडल आणि फेसबूक यांवर द्यावी अन् पत्रकारांनाही द्यावी; जेणेकरून आपण यात खरेच काही तरी कारवाई करत आहोत, हे लोकांपर्यंत पोचेल, तसेच ‘मशिदीच्या भोंग्यांविषयी पोलीस काही करत नाहीत’, असा जो लोकांचा समज आहे तो अल्प होण्यास साहाय्य होईल.

हिंदु विधीज्ञ परिषदेने पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस कमिशनर यांना पाठवलेले पत्र पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा –

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *