बीजिंग : भारताने टिक टॉक या चिनी ‘अॅप’वर घातलेल्या बंदीमुळे या ‘अॅप’ची मालकी असलेल्या ‘बाईट डान्स’ कंपनीला ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल, अशी शक्यता चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्राने वर्तवली.
टिक टॉकसह ५९ चिनी ‘अॅप’वर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाची चीनमध्ये बरीच चर्चा चालू आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतही भारताच्या निर्णयाची दखल घेण्यात आली असून काही अमेरिकेतील अनेक खासदारांनी ट्रम्प सरकारला भारताच्या निर्णयाचे अनुकरण करण्याची विनंती केली आहे. ‘शॉर्ट व्हिडिओ शेअरींग अॅप’ हे चिनी ‘अॅप’ राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे या खासदारांचे मत आहे. अमेरिकेत टिक टॉकचे अनुमाने ४ कोटी वापरकर्ते आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात