हे होणे अपेक्षितच होते ! पाकमध्ये सहजतेने सरकारी खर्चातून हिंदूंचे मंदिर बांधण्यात येणे अशक्यच गोष्ट आहे, हे यातून लक्षात येते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये बनवण्यात येणार्या पहिल्या हिंदु मंदिराला आता विरोध होऊ लागला आहे. या मंदिराला १० कोटी रुपये देण्याची घोषणा पाक सरकारने केली होती. नुकतेच या मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. यास विरोध करतांना इस्लामचे शिक्षण देणारी संस्था ‘जामिया अशर्फिया’चे मुफ्ती जियाउद्दीन यांनी, ‘मुसलमानेतरांना म्हणजे हिंदूंना मंदिर अथवा अन्य धार्मिक स्थळ बनवण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जाऊ येऊ शकत नाहीत’, असे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात