दूरचित्रवाहिनीची मालकी मिशनरींकडे असल्याची माहिती लपवून ठेवल्याचाही ठपका
भारतातही या वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. हे पहाता केंद्र सरकारने ‘या वाहिनीकडून भारतातही धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते का ?’ याचा शोध घेऊन त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे !
जेरुसलेम (इस्रायल) : ‘गॉड टीव्ही’ या हिब्रू भाषेत प्रक्षेपण करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या खासगी दूरचित्रवाहिनीवर इस्रायलने बंदी घातली आहे. ‘या वाहिनीने प्रक्षेपण चालू करण्याच्या अर्जावर त्याची मालकी मिशनरींकडे असल्याची माहिती लपवून ठेवली होती आणि या वाहिनीद्वारे देशात धर्मांतराला प्रोत्साहन देण्यात येत होते’, असे आरोप करण्यात आले आहेत. इस्रायलमध्ये ‘गॉड टीव्ही’ ‘शेलानू’ नावाच्या हिब्रू भाषेतील वाहिनीद्वारे तिचे प्रसार साहित्य प्रसारित करत होती.
१. इस्रायलमधील ‘टीव्ही केबल नियंत्रण परिषदे’चे अध्यक्ष अशर बिटन यांनी म्हटले आहे की, ‘प्रसारण थांबवण्यासाठी ‘गॉड टीव्ही’ला ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.’
२. बिटॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या वाहिनीचे प्रक्षेपण ख्रिस्ती लोकसंख्येसाठी करण्यात येत आहे; मात्र ते ख्रिस्ती धर्मातील माहितीद्वारे ज्यू लोकांना धर्मांतरासाठी आवाहन करत आहेत.’
३. ‘गॉड टीव्ही’ची स्थापना वर्ष १९९५ मध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. सध्या ३० कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचा दावा करत असलेल्या या वाहिनीचे अनेक देशांमध्ये प्रक्षेपण होत आहे. या वाहिनीच्या आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणाची अनुज्ञप्ती अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका संस्थेकडे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात