Menu Close

चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास देशभरातील कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील ! – भाजपचे आमदार राम कदम यांची चेतावणी

  • ‘नेटफ्लिक्स’वरील तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान केल्याचे प्रकरण

  • धर्मप्रेमींकडून ट्विटरवर ‘#BoycottNetflix’ या ‘ट्रेंड’द्वारे विरोध

  • हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी करणार नाही !
  • हिंदु सहिष्णू असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंच्या देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे सर्रास विडंबन करण्यात येत आहे. अशा प्रकारचा अवमान जर अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात झाला असता, तर त्याच्या भयंकर परिणामांची जाणीव ठेवून पोलीस आणि प्रशासन यांनी तत्परतेने दोषींवर स्वतःहून कारवाई केली असती. हिंदु संघटित नसल्याने त्यांच्या विरोधाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याने हिंदूंनी एकजुटीने आणि वैध मार्गाने या चित्रपटाला विरोध केला पाहिजे !  

मुंबई : ‘कृष्णा अँड हिज लीला’ या तेलुगु चित्रपटात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे विडंबन केले गेले आहे, हे दुर्दैवी आहे. यामुळे कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशा आक्षेपार्ह चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. या चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास कृष्णभक्त या नात्याने मी आणि देशभरातील कोट्यवधी कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी ‘नेटफ्लिक्स’ या ‘ऑनलाईन’ चित्रपट प्रदर्शित करणार्‍या संकेतस्थळाला दिली आहे.

‘कृष्णा अँड हिज लीला’ नावाचा तेलुगु चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर २५ जूनपासून प्रसारित करण्यात आला आहे. या चित्रपटात ‘कृष्णा’ नावाच्या मुख्य अभिनेत्याचे अनेक युवतींशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच त्यातील एका अभिनेत्रीचे नाव ‘राधा’ ठेवण्यात आले आहे. याविषयी देशभरातील भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सामाजिक प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून ‘नेटफ्लिक्स’वर बंदी घालण्याची मागणी देभरातील हिंदुत्वनिष्ठ आणि कृष्णभक्त यांच्याकडून करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *