अर्थसंकल्पीय अधिवेश रहित
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचे पतंप्रधानपद धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट घेतली आणि नंतर आपात्कालीन परिस्थितीमध्ये बोलवण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रहित करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान ओली देशाला उद्देशून भाषण करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी १ जुलै या दिवशी सायंकाळी छातीत दुखत असल्याच्या कारणास्तव ओली यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
(सौजन्य : News Nation)
ओली यांना चीनची फूस असल्याने त्यांनी भारताचे ३ भाग नेपाळचे असल्याचा दावा करत नवीन मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे, तसेच भारतीय महिलांना नेपाळमध्ये विवाह करून आल्यावर ७ वर्षे नागरिकत्व न देण्याची घटनादुरुस्ती करण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे चीनने नेपाळचा भूभाग गिळंकृत केला असून त्यावर ओली यांनी मौन बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, तसेच माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात