आसुरी विस्तारवादी मानसिकता जोपासणार्या चीनला आता जगातील सर्व देशांनी मिळून धडा शिकवायला हवा !
पेइचिंग : रशियातील व्लादिवोस्तोक हे शहर वर्ष १८६० मध्ये आमचे होते’, अशा शब्दांत चीनने आता या शहरावर स्वतःचा दावा सांगितला आहे. चीन सरकारची वृत्तवाहिनी असलेल्या ‘सीजीटीएन्’चे संपादक शेन सिवई यांनी हा दावा केला. व्लादिवोस्तोक शहर हे पूर्वी ‘हैशेनवाई’ या नावाचे ओळखले जात होते, जे रशियाने एकतर्फी संधी करून चीनकडून हिसकावून घेतले होते.
चीनने आमच्या पाणबुडीशी संबंधित महत्त्वाची धारिका चोरली ! – रशियाचा आरोप
चीनने आमच्या पाणबुडीशी संबंधित महत्त्वाची माहिती असलेली धारिका चोरली आहे, असा आरोप रशियाने काही दिवसांपूर्वी केला होता. या प्रकरणी रशियाने त्यांच्या एका नागरिकाला अटकही केली होती. त्याच्यावर देशद्रोहाच्या अंर्तगत खटला चालू आहे.
व्लादिवोस्तोक शहराचे सामरिकदृष्ट्या महत्त्व
व्लादिवोस्तोक शहर हे रशियाचे मोठे नौदल केंद्र मानले जाते. प्रशांत महासागरात असलेल्या रशियाच्या नौदलाच्या साम्राज्याचे हे प्रमुख केंद्र आहे. रशियाच्या उत्तर पूर्वेला असलेले हे शहर प्रिमोर्स्की क्राय या राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ आहे. व्यापाराच्या दृष्टीनेही हे शहर रशियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसर्या महायुद्धात याच शहरात जर्मनी आणि रूस यांच्या सैन्यांत भीषण युद्ध झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात