धर्मांधांच्या विरोधानंतर पाक सरकारकडून मंदिराच्या बांधकामावर बंदी
- हे होणारच होते. त्यामुळे याविषयी आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! जेथे वर्ष १९४७ नंतर हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली, त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, तेथे कत्तलखाने उघडण्यात आले, त्या देशात हिंदूंचे मंदिर आणि तेही सरकारी पैशाने बांधले जाणे कधीतरी शक्य होईल का ?
- ‘भारतात भाजपच्या राज्यात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात. आम्ही दाखवून देऊ की, अल्पसंख्यांकांचे रक्षण कसे केले जाते’, असे मोठ्या आविर्भावात बोलणारे इम्रान खान यांच्या पाकमध्ये प्रत्यक्षात काय चालू आहे, हे ते आता सांगतील का ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) : येथे प्रथमच हिंदूंचे मंदिर बांधण्यात येणार होते आणि मंदिराचे भूमीपूजन आणि शिलान्यासही करण्यात आला होता. अलीकडेच काही धर्मांधांनी शिलान्यासाच्या वेळी करण्यात आलेले छोटे बांधकाम तोडले. २ दिवसांपूर्वीच इम्रान खान सरकारने या मंदिराच्या बांधकामावर बंदी घातली होती. पाक सरकारकडूनच या मंदिराला १० कोटी रुपये देण्यात येणार होते. मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर येथील एका इस्लामी संस्थेने मंदिराला आणि सरकारने मंदिराला पैसे देण्यासही विरोध केला होता. त्यानंतर लगेच सरकारकडून मंदिरावर बंदी घालण्यात आली.
या मंदिराचे बांधकाम पाकच्या ‘कॅपिटल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’कडून करण्यात येत होते. आता पाक सरकारने मंदिरासंबंधी ‘इस्लामिक आयडॉलॉजी काऊंसिल’कडून सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान इम्रान खान हे मंदिराला आर्थिक साहाय्य करण्यावर निर्णय घेणार
धार्मिक संदर्भातील मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘पंतप्रधान इम्रान खान अल्पसंख्यांकांच्या पूजास्थळांना आर्थिक साहाय्य करण्यावर निर्णय घेणार आहेत. पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षण केले जाईल.’ (निव्वळ आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी पाक सरकारने मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता, हे हिंदू जाणून आहेत ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात