बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पावले उचलणे अपेक्षित !
ढाका (बांगलादेश) : पिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या उत्तर वेसकी इलेकता गावातील स्वप्नचंद्र मित्रा यांच्या कुटुंबावर २६ जून या दिवशी ६ सशस्त्र धर्मांधांनी आक्रमण करून ४ जणांना गंभीर घायाळ केले. या आक्रमणाचा सूत्रधार महंमद रिपन जमादार हा राजकीय नेता आहे. ‘आमच्या कुटुंबाला वारसाहक्काने मिळालेल्या घरातून हुसकावून लावून ती भूमी बळकावण्याच्या उद्देशाने हे आक्रमण घडवण्यात आले’, असे श्री. मित्रा यांनी म्हटले आहे. आक्रमण झाल्यानंतर मित्रा कुटुंबाला ३० जूनपर्यंत घरातच कोंडून ठेवण्यात आले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासही बंदी करण्यात आली. या आक्रमणामागे तथाकथित हिंदु कार्यकर्ता सुशांकर कुमार बिस्वास याचाही हात होता. (असे हिंदू हेच हिंदु धर्माचे वैरी ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
या आक्रमणाची माहिती मिळाल्यावर बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक पू. (अधिवक्ता) रविंद्र घोष यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. प्रथम त्यांनी मित्रा कुटुंबाची पोलिसांच्या साहाय्याने घरातून मुक्तता केली आणि घायाळांना रुग्णालयात भरती केले. नंतर त्यांनी मठाबारिया पोलीस ठाण्यात ६ धर्मांधांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात