नेपाळचा कारभार चीनच चालवत आहे, हेच यातून लक्षात येते ! ‘नेपाळमधील हिंदू जनतेला हे मान्य आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो !
काठमांडू (नेपाळ) : नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचे पंतप्रधानपद वाचवण्यासाठी नेपाळमधील चीनच्या राजदूत होऊ यांकी या प्रयत्न करत असून ओली यांचे पंतप्रधानपद अद्यापही शाबूत असणे, हे यांकी यांचे पहिल्या टप्प्यातील यश मानले जात आहे. त्यांच्या नेपाळमधील राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेपावरून नेपाळमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना नेपाळमधील राजकीय नेते आणि राजकीय तज्ञ यांच्याकडून विरोध होऊ लागला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानेही राष्ट्रपतींच्या भेटीवरून म्हटले आहे की, ‘चिनी राजदूत राजकीय आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत.’
१. नेपाळी दैनिक ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार यांकी यांनी राष्ट्रपती विद्या भंडारी, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे कार्याध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड, ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाल आणि झालानाथ खनल यांची भेट घेतली. हे तिघेही ओली यांना पदाचे त्यागपत्र देण्याची मागणी करत आहेत; मात्र राष्ट्रपती विद्या भंडारी या ओली यांच्या समर्थक मानल्या जातात.
२. सूत्रांच्या माहितीनुसार नेपाळ सरकारने नवीन मानचित्र बनवून त्यात भारताचे ३ भाग नेपाळशी जोडले आहेत. असे या दाखवण्यामागे यांकी यांचाच हात असल्याचे सांगितले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात