Menu Close

(म्हणे) ‘मंदिर बांधाल, तर मान कापून मंदिरासमोरील कुत्र्यांसमोर फेकू !’ – पाकमधील मौलानाची हिंदूंना धमकी

  • पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू कसे दहशतीखाली जीवन जगत आहेत, हेच यातून दिसून येते ! याविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, काँग्रेस, समाजावादी पक्ष, साम्यवादी आदी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदुबहुल भारतात इस्लामची शिकवण देणार्‍या मरदशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते, तर इस्लामबहुल पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना मंदिर न बांधण्यासाठी धमक्या ! हिंदूंची ही दुःस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानमध्ये देणग्या घेऊन मशिदी बांधल्या जातात आणि मंदिरासाठी पाकिस्तानच्या तिजोरीतून पैसे काढून दिले जात आहेत. जर तुम्ही मंदिर बांधाल, तर पाकिस्तान आणि येथील समाज तुमची मान कापून मंदिरासमोर फिरणार्‍या कुत्र्यांसमोर टाकेल, अशी धमकी देणारा पाकमधील एका मौलानाचा ‘व्हिडिओ’ कॅनडातील पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी ट्विटवर पोस्ट केला आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पहिले हिंदु मंदिर बांधण्यात येणार होते. त्यासाठी पाक सरकारकडून १० कोटी रुपयेही देण्यात येणार होते; मात्र या मंदिराच्या शिलान्यासानंतर करण्यात आलेले बांधकाम अज्ञात धर्मांधाने नुकतेच तोडून टाकले. त्यामुळे सरकारने या मंदिराच्या बांधकामावर स्थगिती आणली आहे. येथे कृष्ण मंदिर बांधण्यात येणार होते. त्यासाठी एच्-९ भागामध्ये २० सहस्र वर्गफूट इतकी भूमीही घेण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *