बीजिंग (चीन) : गलवान खोर्यातील भारत आणि चीन यांच्या सैन्यातील धुमश्चक्रीमध्ये चीनचे १०० सैनिक ठार झाले; मात्र चीन सरकार ही आकडेवारी लपवत आहे. सत्य समोर आल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर नामुष्की ओढावेल, असा दावा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचा मुलगा आणि चिनी सैन्यातील माजी अधिकारी जिनाली यांग यांनी केला आहे. यावर चीन किंवा भारत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही; मात्र सामाजिक माध्यमांतून हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. यांग यांनी नुकतेच या धुमश्चक्रीविषयी विधान करतांना ‘चीन सरकार जाणीवपूर्वक त्याच्या ठार झालेल्या सैनिकांची आकडेवारी लपवत आहे. ही संख्या घोषित केली, तर चीनला लज्जास्पद ठरेल, तसेच चीनमधील माजी सैनिक बंड करतील’, असे म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात