असे विधान करणार्यांच्या विरोधात भारतातील मुसलमान मौलाना, विचारवंत, पुरो(अधो)गामी कधी बोलतील का ?
कुआलालंपूर (मलेशिया) – मुसलमानांप्रती चांगले विचार ठेवणार्या मुसलमानेतरांनी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती (जन्नत) मिळणार नाही. (एरव्ही धर्मांधांच्या बाजूने बोलणारे, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे आणि इफ्तारच्या मेजवान्या आयोजित करणारे याविषयी काही बोलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) असे मुसलमानेतर नरकातच जातील; कारण मूर्तीपूजा करण्याचे पाप अन्य कोणत्याही गुन्ह्यापेक्षा मोठे आहे, असे आक्षेपार्ह विधान जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या डॉ. झाकीर नाईक याने केल्याचा एक ‘व्हिडिओ’ ‘यू ट्यूब’वर प्रसारित करण्यात आला आहे.
सध्या भारतातून पसार असणारा डॉ. झाकीर मलेशियामध्ये रहात आहे. भारताने मलेशियाकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली आहे.