Menu Close

मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा : विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली. दळणवळण बंदीच्या काळात मंदिरे बंद ठेवण्यात आली असतांना ही मशीद कोणत्या आधारावर उघडण्यात आली ? या मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सहमंत्री श्री. श्रीराज नायर यांनी दिली. ८ जुलै या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, ‘मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा हा केवळ मशिदीवर नव्हे; तर सार्वजनिक व्यवस्थेवर लावण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी हा अनधिकृत भोंगा हटवण्यात यावा. या विरोधात आवाज उठवणार्‍या कु. करिश्मा भोसले यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. या शिष्टमंडळाने या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही भेट घेतली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *