Menu Close

लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ‘#जनसंख्या_नियंत्रण_अध्यादेश’ हा ‘ट्रेंड’ दुसर्‍या क्रमांकावर !

मुंबई – ११ जुलै या दिवशी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ९ जुलै या दिवशी ट्विटरवर ‘#PopulationControlLaw’ आणि ‘#जनसंख्या_नियंत्रण_अध्यादेश’ असे २ ‘हॅशटॅग ट्रेंड’ झाले होते. यामध्ये ट्वीट करणार्‍यांनी भारत सरकारने बहुमताने लोकसंख्येचे धोरण ठरवण्याचा प्रस्ताव संमत करून त्या आधारे कठोर आणि प्रभावी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची मागणी केली. हा कायदा सर्व धर्मांच्या लोकांना लागू करावा, अशीही त्यांनी मागणी केली.  ‘#PopulationControlLaw’ हा ‘ट्रेंड’ काही कालावधीतच तिसर्‍या, तर ‘#जनसंख्या_नियंत्रण_अध्यादेश’ हा ‘ट्रेंड’ दुसर्‍या क्रमांकावर आला.

सध्या भारताची लोकसंख्या १३८ कोटी आहे, तर जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे. म्हणजेच जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १८ टक्के आहे. लोकसंख्या वाढल्याने आरोग्य, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *