Menu Close

तुळजापूर येथे कोरोना विषाणूच्या निवारणार्थ रहात्या घरी होमहवन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

  • दळणवळण बंदी असतांनाही सूर्यग्रहणाच्या काळात अंनिसकडून ग्रहणाविषयी लोकांची दिशाभूल करणारा जाहीर कार्यक्रम सांगलीतील ईश्‍वरपूर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अंनिसचे कार्येकर्ते आणि स्थानिक ‘मास्क’ न लावता आणि सामाजिक अंतराचे पालन न करता सहभागी झाले होते. त्यांच्यावर गुन्हा का नोंद झाला नाही ?
  • ईदच्या काळात मुंबईतील भेंडीबाजार आणि अनेक वस्त्यांमध्ये मुसलमान मोठ्या संख्येत खरेदी करण्यासाठी अन् नमाज पढण्यासाठी एकत्र आले होते. याप्रकरणी किती जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे !
  • केवळ हिंदु पंडित आहे आणि हिंदू सहिष्णू आहेत; म्हणून त्यांच्याविरुद्ध कायद्याचा बडगा दाखवत रहात्या घरी केलेल्या होमहवनामुळे कारवाई करण्यात येत आहे का ?

धाराशिव – कोरोना विषाणूच्या निवारणार्थ तुळजापूर येथे होमहवन करणारे नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांच्यावर ९ जुलै या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंबुलगे यांनी १५ आणि १६ मे या दिवशी रहात्या घरी ‘मन्युसुक्त’ होमहवन केले होते. या प्रकरणी ‘ऑनलाईन’ तक्रार प्राप्त झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. होमहवन करतांना ‘मास्क’ आणि सुरक्षित अंतर यांचे पालन केले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

मला दिला जात असलेल्या नाहक त्रासाची समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नोंद घ्यावी ! – नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुलगे, सचिव, नंदीबुवा चॅरीटेबल ट्रस्ट, तुळजापूर.

या प्रकरणी नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, ‘कोराना महामारीविरुद्ध सरकारच्या उद्देशाला साहाय्य व्हावे यासाठी एक आध्यात्मिक कृती करण्याचा हा प्रयत्न केला होता. हे हवन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी केलेले नसून घरात केलेले आहे. हे हवन करण्यामागे केवळ मानव कल्याण हाच उद्देश होता. मला दिला जात असलेल्या नाहक त्रासाची समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नोंद घ्यावी. आमच्या घरामध्ये अग्निहोत्राची उपासना केली जाते. घरामध्ये सुरक्षित अंतर कसे राखावे, याविषयी शासनाने सांगावे. याविषयी पोलीस निरीक्षकांना तक्रारीची प्रत मागितली असता त्यांनी दिली नाही. मी केलेली धार्मिक कृती हा धर्माचरणाचा भाग आहे.

ग्रहण काळात गर्भवती महिलेकडून सार्वजनिक ठिकाणी भाजी चिरणे, अन्न ग्रहण करणे, असे प्रकार करून घेतले जातात, तेथे कोणतेही सुरक्षित अंतर राखले गेले नाही, तसेच अनेक मद्याच्या दुकानांमध्ये सुरक्षित अंतराचा फज्जा उडवण्यात आला; मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही. केवळ धार्मिक कृतीला विरोध करण्यासाठी हे षड्यंत्र आहे.

घरी होम हवन करणे, हा गुन्हा आहे का ? – डॉ. सच्चिदानंद शेवडे

२ मासांनी संसर्ग शक्यतेचा गुन्हा दाखल होतो, हा काय प्रकार आहे ? घरी होम हवन करणे, हा गुन्हा आहे का ? पुढे चालून घरात जनकल्याणार्थ प्रार्थना, पसायदान, अभंग म्हणण्यावरही बंदी येऊ शकेल. जनकल्याणार्थ आपल्या श्रद्धेनुसार केल्या जाणार्‍या गोष्टींवर गुन्हा नोंद कशासाठी ? घरात कोणी मास्क वापरते का ? घरात सुरक्षित अंतर राखले नाही म्हणजे काय ? तक्रार करणारा त्यांच्या घरात डोकवायला गेला होता का ? अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘फेसबूक’वर मांडली आहे.

नागेशशास्त्री यांच्या केसालाही धक्का लागल्यास आम्ही शांत बसणार नाही ! – विश्‍वजित देशपांडे, प्रदेशाध्यक्ष, परशुराम सेवा संघ, महाराष्ट्र

तुळजापूर येथील नागेशशास्त्री यांनी मेमध्ये त्यांच्या घरामध्ये घरातील कुटुंबियांसह ‘मन्यूसूक्त’ हवन केले. हे हवन करू शकणारे महाराष्ट्रात अल्प जण आहेत. हे हवन सृष्टीवर मोठे संकट येते, त्या वेळी समस्त सृष्टीच्या कल्याणार्थ केले जाते. तुमचा कदाचित् यावर विश्‍वास नसेल; पण त्यामुळे आमच्या श्रद्धांना ठेच पोचवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. लोक कल्याणार्थ काम करणार्‍या विद्वान व्यक्तींवर गुन्हा नोंद करणे अयोग्य आहे. नागेशशास्त्री यांच्या केसालाही धक्का लागल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही कायद्याचा सन्मान करतो, याचा अर्थ असा नव्हे की, मोगलाई सहन करू.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *