काही ठिकाणी पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे शक्य नाही. सध्याच्या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रभाव न्यून होईल, असे वाटत नाही, असे विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी केले आहे. येथील ऑनलाईन बैठकीत रेयान यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखून जगाला पुन्हा दळणवळण बंदीसारख्या स्थितीत जाण्यापासून रोखता येऊ शकते. काही ठिकाणी पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याला पर्याय नाही; कारण कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने वाढत आहे.
भारतात २४ घंट्यात २७ सहस्र नवे रुग्ण
गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनाचे २७ सहस्र ११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २२ सहस्र १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० सहस्र ९१६ झाली आहे. त्यातील ५५ टक्क्यांहून अधिक जण बरेही झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments