-
मंदिराचा संरक्षकही मुसलमानच !
-
सध्या या मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नाही !
- इस्लामी देशातील हिंदूंच्या मंदिराची दुर्दशा जाणा ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी, मानवाधिकारवाले प्रसारमाध्यमे आदी तोंड का उघडत नाहीत ?
- पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंचे आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणे, हे गेल्या ७२ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !
इस्लामाबाद : येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर अद्यापही बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु त्यांना पूजा केल्याविनाच परत जावे लागते.
१. १४ वर्षे वनवासात असतांना भगवान श्रीराम, सीतामाता आणि श्री लक्ष्मण हे येथेच रहात होते. त्यामुळे हिंदूंसाठी या मंदिराचे विशेष असे महत्त्व आहे.
२. या पवित्र स्थळी राजा मान सिंह यांनी वर्ष १५८० च्या सुमारास राममंदिर बांधले.
३. येथे एक सुंदर रामकुंड अस्तित्वात होता. भगवान श्रीरामाने या तलावातील पाणी प्राशन केले होते. वर्ष १८९३ पर्यंत प्रत्येक वर्षी याच रामकुंडाजवळ जत्रा भरत असे. सध्या या प्राचीन रामकुंडाचे रूपांतर एका दुर्गंधीयुक्त नाल्यात झाले आहे.
४. फाळणीनंतर हे मंदिर पाकच्या कह्यात गेले. तेव्हापासून हिंदूंना तेथे पूजा-अर्चा करू दिली जात नाही.
५. वर्ष १९६० मध्ये पाकमधील हिंदुद्वेषी सरकारने या मंदिराचे मुलींच्या शाळेत रूपांतर केले. या हिंदूंनी कडाडून विरोध केल्यावर वर्ष २००६ मध्ये ही शाळा अन्यत्र हलवून मंदिर पूर्णपणे रिकामे करण्यात आले.
६. पाक सरकारने वर्ष २००८ मध्ये या राममंदिराला ‘वारसा स्थळ’ घोषित करून मंदिराच्या पुननिर्माणचे कार्य चालू केले. विशेष म्हणजे या मंदिराचे पुनर्निमाण करतांना मंदिरातील मूर्ती मात्र काढून टाकण्यात आल्या. सध्या या मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नाही. तेव्हापासून हे गाव सैदपूर नावाने ओळखले जाऊ लागले.
७. त्यानंतर येथे अनेक मांसाहरी हॉटेल, तसेच हस्तशिल्पांची दुकाने उघडण्यात आली आहेत.
८. या मंदिराच्या परिसरात एक धर्मशाळा बांधण्यात आली असून त्याचा वापर आता सार्वजनिक शौचालय म्हणून केला जातो.
३ सहस्र हिंदूंसाठी एकही मंदिर नाही ! – सवाई लाल, हिंदुकार्यकर्ते
पाकमधील हिंदु कार्यकर्ते श्री. सवाई लाल म्हणाले, ‘‘इस्लामाबादमध्ये ३ सहस्र हिंदू रहातात; मात्र हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. (हिंदूबहुल भारतात मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अल्पसंख्यांकांसाठीही मोठमोठी प्रार्थनास्थळे असून त्यावर कर्णकर्कश आवाजात अवैध भोंगेही लावलेले असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) सरकारने अस्तित्वातील राममंदिरच्या परिसरात हाटेल आणि दुकाने चालू करून या मंदिराचे पावित्र्य भंग केले आहे.’’
१,२८८ हिंदु मंदिरांपैकी केवळ ३१ मंदिरांत हिंदूंना दर्शनाची अनुमती ! – पाकिस्तान हिंदू काऊन्सिल
‘पाकिस्तान हिंदू काऊन्सिल’चे संरक्षक प्रमुख रमेश कुमार वांकवानी म्हणाले, ‘‘सध्या येथे १,२८८ मंदिराच्या नोंदी आहेत; मात्र त्यांपैकी केवळ ३१ मंदिरांत हिंदूंना दर्शनाची अनुमती देण्यात आली आहे. सरकारने आम्हाला या प्राचीन राममंदिराचा जीर्णोद्धार करण्याची अनुमती दिली पाहिजे.’’ फाळणीनंतर पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या लोकांच्या संपत्तीच्या देखभालीचे दायित्व ‘पाकिस्तान हिंदू काऊन्सिल’कडे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात