Menu Close

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन उद्योगपती संमेलन’

पूर्वोत्तर भारतातील १०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग !

वाराणसी : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी आणि निर्माण झालेल्या मानसिक तणावाला सामोरे जाण्यासाठी समाजाचे मनोबल वाढवण्याकरता राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करणार्‍या उद्योगपतींनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. या दृष्टीने उद्योगपती परिषद प्रयत्न करत असून यात उद्योगपतींनीही सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘उद्योगपती संमेलन’ नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या संमेलनाचा उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड आणि बंगाल येथील १०० हून अधिक उद्योजकांनी लाभ घेतला. या वेळी समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि समितीचे प्रयागराज समन्वयक श्री. गुरुराज प्रभु यांनी उपस्थित उद्योजकांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. या वेळी काही उद्योजकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

१. मार्गदर्शन करतांना पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले की, ‘‘कठीण परिस्थितीमध्ये आत्मबळ टिकवून ठेवण्यासाठी साधना वाढवली पाहिजे. स्तोत्रपठण, नामजप, अग्निहोत्र इत्यादी उपायांनीही आपण स्वत:चे रक्षण करू शकतो.’’

२. श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले की, ‘अनेक संतांनी ‘येणारा काळ भीषण आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे उद्योजकांनी काळानुसार त्यांचे धोरण ठरवले, तर ते निश्‍चितच कठीण परिस्थितीत स्वत:सह राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु स्वयंसूचना इत्यादी उपायांनी आपण त्यावर निश्‍चित मात करू शकतो.’

३. श्री. गुरुराज प्रभु यांनी ‘सत्पात्रे दानम्’चे महत्त्व सांगून ‘धर्मसंस्थापनेसाठी प्रयत्न करत असलेले संत आणि संस्था यांना दान देऊन साहाय्य करणे, ही आपली साधनाच आहे’, असे विचार व्यक्त केले.

उद्योजकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. करुणापती दुबे, सनदी लेखापाल, भदोही, उत्तरप्रदेश : जेव्हापासून मी सनातन संस्थेशी जोडलो गेलो आहे, तेव्हापासून मी नामजप करण्यास प्रारंभ केला. मी नियमित ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतो. मला शांतता अनुभवत आहे. माझा संयम वाढला असून प्रतिक्रिया न्यून झाल्या आहेत. याचा माझ्या वैयक्तिक जीवनात मला फार लाभ झाला आहे. माझे ग्राहकदेखील इतरांसमोर माझे कौतुक करतात की, ‘मी खूप प्रेमाने आणि नम्रपणे सर्व हाताळतो.’ याचा लाभ व्यावहारिक जीवनातही होत आहे.

२. श्री. दिलीप कुमार अगरवाल, कतरास, झारखंड : नामजपास प्रारंभ केल्यापासून माझ्या वैयक्तिक जीवनातील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. नामजप केल्यावर माझ्या मनाला चांगले वाटते.

३. श्री. दीपक बबुना, हाजीपूर, वैशाली, बिहार : जेव्हा मी तणावात असतो, तेव्हा नामजप केल्यामुळे मन शांत होते. नामजपात फार शक्ती आहे. काही वेळातच मन स्थिर झाल्यामुळे मी माझे काम चांगल्या प्रकारे करू शकतो.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *