गोवंशियांची अवैध वाहतूक रोखल्याचे प्रकरण
प्रथम पोलीस अधिकार्यांची उडवाउडवीची उत्तरे
स्वतः गोवंशियांची अवैध वाहतूक रोखायची नाही आणि हिंदुत्वनिष्ठांनी अशा अवैध वाहतुकीविषयी कळवल्यावर तत्परतेने कारवाई करायची नाही, अशा वृत्तीचे पोलीस समाजात कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून उपयोग नाही, तर त्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी सरकारने यंत्रणाही सक्षम करणे आवश्यक आहे !
जळगाव – जिल्ह्यातील वरणगाव येथे अमानुषपणे आणि अनधिकृतपणे गोवंशियांची वाहतूक करण्यात येत होती. त्यास स्थानिक हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती श्री. प्रदीप महाराज यांनी विरोध दर्शवला असता धर्मांध वाहनचालकाने त्यांच्या हातातील भ्रमणभाष हिसकावून घेतला. त्यांनी काढलेल्या घायाळ गोवंशियांची छायाचित्रे नष्ट करून श्री. प्रदीप महाराजांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. ‘पुन्हा या भागात दिसल्यास तुला मारून टाकू’, अशी धमकीही धर्मांधांनी या वेळी मठाधिपती श्री. प्रदीप महाराज यांना दिली. ही घटना १२ जुलै या दिवशी पहाटे सव्वापाचला घडली.
एका छोट्या वाहनात ५ गोवंश अमानुषपणे भरून नेतांना श्री. प्रदीप महाराजांना दिसले. त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात संपर्क केला असता तो झाला नाही. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘तुम्ही पोलीस ठाण्यात या, मग पाहू.’’ तोपर्यंत श्री. प्रदीप महाराज यांनी रस्त्यावर थांबलेल्या आणि संशयास्पद वाटलेल्या त्या गाडीच्या धर्मांध चालकाकडे विचारपूस केली. त्यानंतर धर्मांध चालकाने वरणगावमधील १० व्यक्तींना बोलावून घेतले आणि श्री. प्रदीप महाराज यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
या घटनेनंतर ‘अशा अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर गुन्हे नोंद व्हावे आणि गोवंश अन् गोमांस तस्करी पूर्णपणे थांबवण्यात यावी’, अशा आशयाचे निवेदन समस्त हिंदु संघटनांनी निंभोरा पोलीस ठाण्यात दिले आहे.