‘श्री साईदत्त मानसा पीठम् ’आणि ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’ यांच्या प्रयत्नांना यश
गेल्या १ सहस्र २०० वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक किंवा आमीष दाखवून धर्मांतर करण्यात आले आणि त्यांच्या आताच्या पिढीला पुन्हा हिंदु धर्मांत यायचे असेल, तर अशांसाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते. या कायद्याद्वारे घरवापसी करणार्यांना संरक्षण आणि अन्य सुविधा पुरवण्यात याव्यात.
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – श्री साई दत्ता स्वामींच्या नेतृत्वाखाली १२३ धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’च्या (जी.एच्.एच्.एफ्.च्या) पुढाकाराने १२ जुलै या दिवशी एका कार्यक्रमात शुद्धीकरणाचा विधी पार पडला. हिंदु धर्मात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रीराम पट्टाभिषेकम्चे चित्र, घरासमोर लावण्यासाठी हनुमानध्वज, समोरच्या दारावर लावण्यासाठी ओम, गळ्यात घालण्यासाठी रुद्राक्षाची माळ, कनकनामा, विभूती, अंजनेय यंत्र, श्रीमद्भगवद्गीता, धोतर, साडी, मुलांसाठी कपडे, वह्या, हळद, कुमकुम आणि इतर वस्तू देण्यात आल्या.
‘श्री साईदत्त मानसा पीठम्’ आणि ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने २ मासांहून अधिक काळापासून या घरवापसीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजना आखण्यात येत होती. श्री साई दत्ता स्वामींनी अनेक खेड्यात जाऊन धर्मांतरित ख्रिस्त्यांना हिंदु संस्कृतीच्या समृद्धतेविषयी सांगितले. हिंदू त्यांची आर्थिक परिस्थिती, आरोग्याशी संबंधित सूत्र, हिंदु धर्मग्रंथांचे अन्यांनी केलेले फसवे विवेचन आदी कारणांमुळे फसले जाऊन ख्रिस्ती झाले होते. (हिंदू का धर्मांतर करतात ?, हे यातून लक्षात येते. त्यामुळे हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्वही अधोरेखित होते ! आता पुनर्प्रवेश केलेल्या हिंदूंना या संघटनांनी धर्मशिक्षण द्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)