Menu Close

‘एकाच ठिकाणच्या ४ मशिदींमधील मोठ्या आवाजातील अजानपैकी कुणाचा आवाज अल्लाहपर्यंत जाईल ?´

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भोंग्यांच्या विरोधात कारवाई न होणे, हा संविधानाचा अवमान होय. आतातरी पोलीस आणि प्रशासन याविषयी कारवाई करणार का ? 

मुंबई – एकाच ठिकाणी असलेल्या ४ मशिदींमधून पहाटे ५ वाजता अजानचा आवाज येतो. या वेळी एकमेकांमध्ये स्पर्धा लागते की, कुणी किती मोठ्या आवाजात अजान देणार ? विचार करायची गोष्ट आहे की, यांतील कुणाचा अजान अल्लाहपर्यंत जाईल ? मी विचार करत आहे, तुम्हीही विचार करा, अशा प्रकारे फेसबूकवर पोस्ट पाठवून अभिनेता प्रीतम सिंग यांनी भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिल्या जाणार्‍या अजानविषयी प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Samajh ne wali baat hai ek jagah Mein char masjid hai 4 masjidon se 5 baje Azaan ki awaz aati hai !Baat yah hai ki aapas…

Posted by Pretaam Singh on Sunday, July 12, 2020

काही दिवसांपूर्वी मुंबईतील मानखुर्द येथील एका मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात स्थानिक युवती कु. करिश्मा भोसले हिने आवाज उठवला होता; मात्र पोलिसांनी भोंग्याच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी तिलाच नोटीस पाठवली. याविषयी विश्‍व हिंदु परिषदेच्या शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेऊन भोंगा हटवण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी मशिदींवरून भोंग्यांद्वारे अजान दिली जात आहे; मात्र पोलीस आणि प्रशासन याविरोधात कारवाई करत नाही. यामुळे समाजात असंतोष वाढत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *