Menu Close

अजान देण्यासाठी भोंग्यांचा वापर करण्यास विरोध करणार्‍या हिंदु तरुणीला धर्मांधाकडून बलात्काराची धमकी

धर्मांधांचा हा उद्दामपणा सरकारी यंत्रणा निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या ! त्यामुळे आता समस्त हिंदूंनी संघटित होऊन अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकराला भाग पाडायला हवे !

नवी देहली – अजान देण्यासाठी भोंग्यांचा वापर करण्यास विरोध करणार्‍या हिंदु तरुणीला धर्मांधाने बलात्काराची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला.

एका हिंदु मुलीने सामाजिक संकेतस्थळाद्वारे हातात फलक धरल्याचे अन् त्यावर ‘अजान द्या; पण आवाज न्यून करा. ध्वनीक्षेपकाद्वारे तुम्ही काय सिद्ध करू पहात आहात ?’, असा संदेश लिहिलेले छायाचित्र प्रसारित केले होते. काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांवर आक्षेप घेणार्‍या मुंबईतील करिश्मा भोसले यांच्या समर्थनार्थ सदर हिंदु मुलीने हे छायाचित्र प्रसारित केले. यावर फरदीन नावाच्या ‘इन्स्टाग्राम’ वापरकर्त्या धर्मांधाने सदर मुलीशी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले, तसेच तिला बलात्काराची धमकी दिली. त्याने पुढे म्हटले की, ‘मी कट्टर मुसलमान आहेत आणि ते कुणाच्या बापाला घाबरत नाही.’ फरदीनने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्द असलेला हा संदेश सध्या सामाजिक माध्यमांवर फिरत आहे.

गेल्या मासातही सुहेल नावाच्या धर्मांधाने केले होते आक्षेपार्ह भाषेत संभाषण

सदर हिंदु मुलीने २८ जून या दिवशी अशाच प्रकारचे छायाचित्र ‘टि्वटर’वरही प्रसारित केले होते. तेव्हा सुहेल नावाच्या धर्मांधानेही तिच्याशी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *