Menu Close

आरोग्यक्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्याचा आधुनिक वैद्यांचा निर्धार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – आरोग्यक्षेत्रातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्यक्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात राज्यघटनात्मक मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली.

१. या बैठकीमध्ये रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन करण्यातील त्रुटी, जीवनोपयोगी औषधे अधिक दराने विक्री केली जात असल्याने जनतेची होणारी लूट, बोगस डॉक्टरांमुळे जनतेची होणारी फसवणूक आदी विविध विषयांवर घटनात्मक मार्गाने कृती करण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली. या संदर्भात समाजात जागृती करणे तसेच एकत्र येऊन कृती करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच यादृष्टीने कृती करण्याचे निश्‍चित केले. दर १५ दिवसांतून एकदा एकत्र येण्याचे ठरवण्यात आले.

२. प्रयाग येथील डॉ.अभिषेक केशरवाणी यांनी उदाहरण देतांना सांगितले की, ‘हल्लीच एका रुग्णाला रात्री १० वाजता रुग्णालयात भरती करण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी ७ वाजता सोडण्यात आले. तरी संपूर्ण २ दिवसांचे देयक भरण्यास त्यांना त्यांना भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे अनेक नागरिकांवर अन्याय होत आहे. याचा सर्व स्तरातून विरोध व्हायला हवा.’

३. या बैठकीमध्ये वाराणसी येथील डॉ. अजयकुमार जयस्वाल, डॉ. भरतलाल जयस्वाल, डॉ. एस. के. श्रीवास्तव, डॉ. अरुण केशरी, डॉ. सुनील, डॉ. श्रीमती पुष्पा जयस्वाल, तसेच आरोग्य साहाय्य समितीच्या समन्वयक अश्‍विनी कुलकर्णी तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री विश्‍वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *