Menu Close

पाकमध्ये धर्मांधांकडून आणखी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

हिंदूबहुल भारतातील अल्पसंख्यांवरील कथित अत्याराचारांच्या प्रकरणाची तात्काळ नोंद घेणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने अमानवी अत्याचार होत असतांना त्याची नोंद कधीही घेत नाही, हे लक्षात घ्या ! या पीडित हिंदूंसाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

इस्लामाबाद – पाकमधील सिंध प्रांतातील एका १२ वर्षीय हिंदु मुलीचे धर्मांधांकडून अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पाकमधील सामाजिक कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली.

मीरपूर येथील नफीसनगर येथे ११ जुलै या दिवशी ही घटना घडली. यामागे महंमद शौकत नावाच्या धर्मांधाच्या टोळीचा हात असल्याचे ऑस्टिन यांनी सांगितले. ऑस्टिन यांनी प्रसारित केलेल्या एका ‘व्हिडिओ’त पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यांची व्यथा मांडली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *